आण्णासाहेब विभूते विद्यामंदिर, धरणगुत्ती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर ही शासनमान्य खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा असून 100 टक्के अनुदानित आहे. या शाळेची स्थापना सन 1991 मध्ये झाली असून 1997 साली शाळेस शंभर टक्के अनुदान मंजूर झाले. इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत प्रत्येकी दोन तुकड्या याप्रमाणे एकूण 14 तुकड्या कार्यरत असून शाळा गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
आमची शाळा संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ, धरणगुत्ती या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे कार्यरत आहे. संस्थेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण व सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. अनुभवी शिक्षकवर्ग, आधुनिक अध्यापन पद्धती व सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार व सुसंस्कृत नागरिक घडविण्याचा शाळेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
पुढे वाचा
आनंददायी व दर्जेदार शिक्षण व्यवस्था
तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग
इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत मराठी माध्यमाची सोय
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी डिजिटल वर्गखोल्या
सहशालेय उपक्रमांसाठी स्वतंत्र सुविधा
वायफाय कॅम्पस ची सोय
ई-लर्निंगद्वारे अध्ययन व पालकांशी सतत संपर्क
स्वतंत्र संगणक कक्ष व संगणक शिक्षण
सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा
क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन
संगीत शिक्षणाची स्वतंत्र सोय
मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय
शासन पुरस्कृत सर्व शासकीय योजनांचा लाभ
स्पर्धा परीक्षा व बाह्य परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे यश
पालकांसाठी विविध मार्गदर्शन उपक्रम
मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर
मुला मुलींच्या सुरक्षेतेसाठी शाळेच्या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय
शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.
| इयत्ता | मुले | मुली | एकूण |
|---|---|---|---|
| 1 ली | 12 | 18 | 30 |
| 2 री | 17 | 17 | 34 |
| 3 री | 24 | 26 | 50 |
| 4 थी | 29 | 32 | 61 |
| 5 वी | 23 | 28 | 51 |
| 6 वी | 24 | 19 | 43 |
| 7 वी | 39 | 34 | 73 |
| एकूण | 168 | 174 | 342 |